दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना; भाजपला मात्र श्रेयाची घाई

दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना; भाजपला मात्र श्रेयाची घाई
Published on

PNE26W51546
सोलापूर : भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात आंदोलन करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता माने, जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, विष्णू कारमपुरी व अन्य.
---
दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना; भाजपला मात्र श्रेयाची घाई
भाजप जिल्हाध्यक्षांचा पोस्टर फडकावत शिवसेना ठाकरे पक्षातर्फे निषेध
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : जिल्ह्यात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना दुष्काळ जाहीर झाल्याचे श्रेय भाजप जिल्हाध्यक्ष घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पाठ थोपटणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या फेसबुक पोस्टचा शिवसेना ठाकरे पक्षाने रविवारी पूनम गेट येथे निषेध केला. चव्हाण यांच्या पोस्टचे पोस्टर फडकावत शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
‘शेतकरी उपाशी, आमदार-खासदार काजू-बदामाची’, ‘महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. दुष्काळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना मंत्री-संत्री काजू-बदाम खात असल्याची टीका करत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महानगरप्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अत्यंत भीषण दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची सरकार दखल घेत नसून वेळकाढूपणा सुरू आहे. अशातच दुष्काळाच्या बैठकीतील चर्चेत मंत्री-संत्री काजू-बदाम खातात. यावरून सरकार दुष्काळाच्या विषयावर किती गंभीर आहे, हे लक्षात येते. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारने करावा, अशी मागणी धाराशिवकर यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार ज्या पद्धतीने पाहात आहे, ते पाहता हे सरकार कष्टकरी शेतकरी उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता माने, जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरप्रमुख सुरेश जगताप, राजाभाऊ कुशेकर, जिल्हा संघटक विष्णू कारमपुरी, उज्ज्वल दीक्षित यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com