'कितीही आपटा पुणे मनपावर भगवा फडकणार'; राऊतांची टोलेबाजी

sanjay raut chandrakant patil
sanjay raut chandrakant patil

पुणे : पुण्यात येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर आज पुण्यातील वडगाव शेरीमध्ये बोलत होते. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी बजावण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी अनेक वक्तव्यं केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपवर भरपूर टीका देखील केली आहे. ते म्हणाले की, ठोकून काढणे हा आपला जुना धंदा आहे . सरकार आहे वगैरे ते सगळं ठिकाय पण मूळ काम विसरायच नाही.

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यावर विरोधकांना पोटशूळ

मुख्यंमंत्री दिल्लीत कशाला गेले याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. अमित शहांनाही भेटले. त्यांची कोणतीही व्यक्तिगत चर्चा झाली नाही. ज्या शासकीय कामासाठी ते गेले होते, ते करुन ते राज्यात परतले. हे सरकार अजून तीन वर्षे चालेल. मुख्यमंत्रीपदी ठाकरेच असतील आणि 2024 नंतरही तेच असतील. महाराष्ट्रातील 105 आमदारांच्या विरोधी पक्षाने काय करावं यासाठी पुण्यासह सगळ्या शहरामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारु, स्वप्न बघण्यावर बंदी आणू, आता बघू नका, आता तुम्ही कितीही आपटलीत तरीही ठाकरे सरकारचा तुम्ही बालही बाका तुम्ही करु शकणार नाही. आपण पुण्यात आलो आहोत, पुण्यातला उत्साह नेहमीच दांडगाच असतो. मुंबईने धडे घ्यावेत इतका दांडगा असतो.

पुणे मनपावर शिवसेनेचा भगवा फडकावा

यावेळी पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता यावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी म्हटल. की मनपामध्ये 10 नगरसेवक आहेत, पण आत 10 राहणार नाहीत. आदित्य शिरोडकर, सचिन अहिर आता 10 वर थांबायचं नाही. पुढल्या निवडणुकीनंतर आपल्याकडे असा एक आकडा लावायचा की आपल्याशिवाय इकडे कुणाचा महापौर होता कामा नये. अजित दादा याच जिल्ह्याचे शहराचे पालकमंत्री आहेत, त्यांच्यासोबत शरद पवराांसोबत बोलणी करु, आघाडी झालीच तर उत्तमच नाही तर आपण आहोतच. पण सगळा खेळ खराब होऊन नये म्हणून पुणे मनपावर शिवेसेनेचा भगवा फडकावण्याची वेळ आलीय. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर ज्या पुण्यावर बाळासाहेबांच पुण्यावर प्रेम होतं, जिथे ते खूप काळ होते, त्या पुण्यावर आपण अजूनही अडखळत काम करत आहोत.

चंद्रकांत पाटलांना टोला

चंपा म्हणणं मी बरं नाहीये, आमची मैत्री खूप जुनी आहे. त्यांच्यावर मी सव्वा रुपयाचा दावा लावलाय. या देशाच्या इतिहासातील सर्वांत कमी रुपयांचा दावा असेल. माझी किंमत तुम्हाला मोजताच येणार नाही, कारण मी शिवसैनिक आहे. मला नको तुमचे 100 कोटी रुपये. मला नकोत तुमचे पैसे. सगळे दिलेय बाळासाहेबांनी. पण मी त्यांच्याकडून सव्वा रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मी कोणताही खटला हारत नाही. राजकारणातही मी तुम्हाला दोन वर्षांपूर्वी हरवलाय. तुम्ही शिवसेनेचं मोल काय करत होतात, शेवटी मी आणि उद्धवजींनी ठरवलं. आमची किंमत काय ते राज्य आणि देश ठरवेल. म्हणून आज आमचे मुख्यमंत्री आज यांच्या नेत्यासोबत जेवत बसले होते. तुम्ही कुठे होतात? गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो मग महाराष्ट्राचा का नाही? जो या राज्याचं नेतृत्व करतात तो देशाचाच नेता असतो. दिल्लीत येणार राज्यात येणार, पण पुण्यात कधी होणार सांगा. ज्या राज्यात शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला तिथे आपली सत्ता यायलाच हवी.

राहुल गांधींना शिवसेनेच्या प्रसिद्धीबाबत कुतूहल

राहुल गांधी मला भेटले होते. त्यांनी विचारलं की, शिवसेनेच्या यशाचं रहस्य काय, लोकप्रियता इतकी कशी काय, याचं कारण काय? मी म्हटलं की, आमची भाषा अनपार्लमेंटरी आहे. नेता बनायचं असेल तर असंवैधानिक भाषा वापरावी लागते. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झाला. जेंव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो तेंव्हा आमचा मंत्र असतो की आम्ही मागे हटणार नाही कधीच. संघर्ष असो वा काहीही असो, आम्ही जेंव्हा जेंव्हा लढे दिले, तेंव्हा आपण रक्त सांडलेत, अनेक खटले अंगावर होते, प्रत्येक जिल्ह्यात खटले होते. आम्ही प्रत्येक खटल्यात लढत राहिलो, कुठे भाषणाचे कुठे लिखाणाचे खटले होते. बाळासाहेब प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक खटल्यात सोबत होते. सरकारचं काम आता उत्तम सुरुय. आता पहाटेचा कार्यक्रम विसरला पाहिजे. अजितदादांवर आमचा विश्वास आहे. त्यांनी आमच्या शिवसैनिकांवर लक्ष द्यावं. फार अडचणी आहेत, असं मला वाटत नाही. आपली व्यवस्था उत्तम सुरुये त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. एकच सांगतो पुण्यातल्या शिवसैनिकांना आपण उद्धवजींचं नेतृत्व जेंव्हा राज्याचं नेतृत्व म्हणून पाहतो, जसे ते या देशातील पहिल्या क्रमांकांचे मुख्यमंत्री बनू शकले तसेच हा पक्ष देखील महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष व्हावा हीच त्यांची इच्छा आहे. शिवसेना ही जात-पात न मानणारी संघटना आहे. बाळासाहेबांनी कधीच जात-पात पाहून पदे दिली नाहीत. तोच विचार आम्ही पुढे नेतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com