Pune : श्री.शिवाजी विद्यालयाच्या इमारतीसाठी सीएसआर फंड मिळण्यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांशी बोलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : श्री.शिवाजी विद्यालयाच्या इमारतीसाठी सीएसआर फंड मिळण्यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांशी बोलणार

पारगाव : धामणी ता.आंबेगाव येथील श्री. शिवाजी विद्यालयाला इतिहास आहे या भागातील सर्वात जुनी शाळा आहे त्यामुळे या विद्यालयाच्या इमारतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या उद्योगांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.

धामणी आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत टीव्हीएस कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आलेल्या विविध भौतिक सुविधांचे तसेच श्री. शिवाजी विद्यालयातील विविध कामांचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, पत्रकार विठ्ठल जाधव, टीव्हीएस कंपनीचे योगेश्वर पाटील ,नवनाथ राक्षे, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, संतोष डोके,खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, उद्योजक लक्ष्मणराव काचोळे, विलास पगारिया,शांताराम जाधव,बापूसाहेब काचोळे, उपसरपंच दत्ता गवंडी, शिरदाळेचे उपसरपंच मयूर सरडे, पहाडदऱ्याचे सरपंच राजश्री कुरकुटे, उपसरपंच सुमन वाघ, सोसायटीचे अध्यक्ष सतीश जाधव, वामनराव जाधव, आनंदा जाधव, मच्छिन्द्र वाघ, संदीप बोऱ्हाडे, मुख्याध्यापिका अनुराधा कथले, प्राचार्य दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, सरपंच सागर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.श्री.आढळराव पाटील पुढे म्हणाले मी ज्यावेळी परदेशात जातो त्यावेळी तेथील पर्यटन स्थळांपेक्षा तेथील शाळांना आवर्जून भेट देतो तेथील सुविधांचा अभ्यास करतो असे सांगून ते म्हणाले शिवाजी विद्यालय परिसरातील सर्वात जुनी शाळा आहे आपण सर्व मिळून या शाळेला एक आदर्श शाळा घडवूया असे प्रतिपादन केले. आभार विलास पगरिया यांनी मानले

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत टीव्हीएस कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आलेल्या विविध भौतिक सुविधांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले