भिलार : ​''पुस्तकांच्या गावात'' शिवजयंतीचा जागर; भिलारमध्ये शिवरायांना अभिवादन

भिलार : ​''पुस्तकांच्या गावात'' शिवजयंतीचा जागर; भिलारमध्ये शिवरायांना अभिवादन

Published on

भिलारमध्ये पुतळ्यास पुष्पहार अर्पण

भिलार, ता. २१ :‘पुस्तकांचे गाव’ भिलार (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
​कार्यक्रमाचा प्रारंभ भिलार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, सरपंच शिवाजी भिलारे, जतिन भिलारे, विवेक कांबळे गुरुजी, कारंडे मॅडम यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
​पुतळा परिसरातील अभिवादनानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्येही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि न्यायनिष्ठ कारभाराचा गौरव केला. तरुण पिढीने शिवछत्रपतींच्या आदर्शांचा अंगीकार करून राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

07336
भिलार : छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना प्रवीण भिलारे, जतिन भिलारे, विवेक कांबळे व मान्यवर. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com