फॅबटेक मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
SGW26B09309
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करताना प्राध्यापक व उपस्थित विद्यार्थी.
---
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, सांगोला
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, अशी माहिती प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली. यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी विभागातील विकास जाधव यांनी भाषणातून आदर्श राजाचे गुण विद्यार्थ्यांसमोर मांडले. तृतीय वर्षातील निखिल घाडगे यांनी शिवगर्जना दिली, तर प्रथमेश पोतदार यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सामूहिक प्रतिज्ञा घेतली. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून शौर्य, दूरदृष्टी, राष्ट्रप्रेम आणि हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचे स्मरण करून देणारा दिवस असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अमोल पोरे यांनी केले. विद्यार्थी रविराज म्हमाणे याने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

