छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गुणवरे येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरी
गुणवरेत विविध उपक्रमांनी
शिवजयंती कार्यक्रम उत्साहात
राजाळे, ता. २२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवरे येथे रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, दंत चिकित्सा शिबिर व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी गुणवरे परिसरातील ४०० हून अधिक ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला. यावेळी डॉ. गुंदेचा, डॉ. सोनाली आढाव, अक्षय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. शिबिरात सहभागी झालेल्या ग्रामस्थांना प्रमाणपत्र व विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता सातवीतील विद्यार्थी धम्मदी आढाव याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर व्याख्यान दिले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी तथागत चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, प्रा. अभिषेक तावरे, डॉ. पलाश कांबळे, कोमल आढाव, बुद्धभूषण आढाव, अरविंद आढाव, रामराजे आढाव, कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले.
A01007
गुणवरे : रक्तदान, दंतचिकित्सा शिबिरप्रसंगी स्वागत करताना मान्यवर. (अमोल पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

