निमगाव केतकी येथे पुष्पहार अर्पण

निमगाव केतकी येथे पुष्पहार अर्पण

Published on

निमगाव केतकी, ता. २० : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी (ता. १९) विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त श्री संत सावतामाळी चौकात सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या शेजारील आवारात आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बालकलाकारांनी शिवरायांच्या जीवनाविषयी माहिती दिली.
यावेळी अंकुश जाधव, दशरथ डोंगरे, मच्छिंद्र चांदणे, देवराज जाधव, सरपंच प्रवीण डोंगरे, तुषार जाधव, तात्यासाहेब वडापुरे, संदीप भोंग, संतोष राजगुरू, अतुल मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ४ वाजता गावातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य अशी पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये, तसेच फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळकरी, मावळा पथक, संबळ वाद्य, तुतारी, अहिंसा बेंजो ग्रुप, हलगी पथक, लेझीम पथक यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com