द रायका स्कूल येथे शिवजयंतीनिमित्त रॅली

द रायका स्कूल येथे शिवजयंतीनिमित्त रॅली

Published on

पिंपळे सौदागर, ता. (१९) ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील द रायका स्कूल मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळा परिसर भगव्या पताकांनी व प्रेरणादायी फलकांनी सजविण्यात आला होता.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण व पोवाडे सादर केले. यानंतर शाळेतून रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भगवे फेटे व पारंपरिक पोशाख परिधान करून शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात रॅली उत्साहात पार पडली. रॅलीतील प्रमुख आकर्षण म्हणून लेझीम पथकाचे सादरीकरण तसेच लाठी-काठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
रॅलीदरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या पूनम रायका यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता काटे व कुंदा भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या प्रांगणात झाला. शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com