जातेगावातील ९१वर्षीय शिवभक्त शिवनेरी नतमस्तक
ओझर, ता. १९ ः छत्रपती शिवरायांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर गुरुवारी (ता. १९) शिवभक्तांचा अफाट जनसागर लोटला होता. जगभरातून लाखोंच्या संख्येने शिवभक्त शिवजन्मभूमीची पायधूळ कपाळी लावण्यासाठी व छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले होते. जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील ९१ वर्षीय तुकाराम काशिनाथ वारे किल्ले शिवनेरीची गडचढण करत शिवरायांचरणी नतमस्तक झाले. पांढरा सदरा पांढरे धोतर डोक्यावर कानटोपी, दोन्ही खांद्यावर अडकवलेल्या एका बंदाच्या दोन शबनम, पायात चपला आणि दोन्ही हातात काठ्या असा मराठमोळा पोशाख केलेले हे आजोबा दरवर्षी शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर येत असतात. एसटी बसने प्रवास करून ते शिवजयंतीच्या आदल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथे दाखल झाले. बस स्थानकावरच मुक्काम करून अंघोळ करून सकाळी त्यांनी पायी किल्ले शिवनेरीची चढण सुरू केली. गेली अनेक वर्षांपासून ते शिवजयंतीनिमित्त गडावर जाऊन महाराजांचे दर्शन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या वयातही तरुणाईला लाजवेल असा त्यांच्यातील उत्साह पाहून शिवभक्तही थक्क झाले.
01828
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

