Shiv Jayanti Utsav Pune : शिवजयंती मिरवणुकीत पुणेकरांचा उत्साह; भवानी माता मंदिरातून सुरुवात

Shivaji Maharaj Jayanti Pune : पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. भगव्या पताका, ढोल-ताशा, ऐतिहासिक वेशभूषा आणि मर्दानी खेळांनी वातावरण शिवमय झाले. भवानी माता मंदिरापासून एसएसपीएमएसपर्यंत मिरवणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Shivaji Maharaj Jayanti Pune

Shivaji Maharaj Jayanti Pune

sakal

Updated on

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहर आज अक्षरशः शिवमय झाले होते. भगव्या पताकांनी सजलेले रस्ते, ढोल-ताशांच्या दणदणाटात दुमदुमणारे वातावरण, ऐतिहासिक वेशभूषेतील बालचमू आणि मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण यामुळे नागरिक भारावून गेले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मिरवणूक भवानी माता मंदिरापासून प्रारंभ होऊन एसएसपीएमएस महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोपास आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com