राणी येसूबाई व चोखोबा स्मारकासाठी धनश्रीचा पुढाकार प्रा.  काळुंगे

राणी येसूबाई व चोखोबा स्मारकासाठी धनश्रीचा पुढाकार प्रा. काळुंगे

Published on

MGV26B15405
मंगळवेढा ः धनश्री पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित शिवजयंतीत समारंभात प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. शोभा काळुंगे व अन्य मान्यवर.

राणी येसूबाई, संत चोखोबा स्मारकासाठी ‘धनश्री’चा पुढाकार ः प्रा. काळुंगे

मंगळवेढा, ता. २२ : मंगळवेढा शहर व तालुक्याला छत्रपतीचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य परंपरेची स्मृती जपण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांना स्वराज्याच्या संघर्षाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ब्रह्मपुरी-माचनूर येथे महाराणी येसूबाई यांचे भव्य स्मारक धनश्री परिवाराच्या माध्यमातून उभारून या वारसास्थळाचे वैभव जतन करू, असा विश्वास धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केला.

धनश्री परिवाराच्या प्रशासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. काळुंगे बोलत होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धनश्री पतसंस्थेच्य अध्यक्षा प्रा. शोभाताई काळुंगे, ज्ञानदेव जावीर, कल्याण रोकडे, ज्ञानेश्वर कांबळे, रामचंद्र बंडगर, सुनीता सावंत, मल्टिस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे उपस्थित होते.
प्रा.काळुंगे म्हणाले, ब्रह्मपुरी-माचणूर येथे १६८५ ते १६८९ या कालावधीत मुघलांची छावणी होती. त्या काळात महाराणी येसूबाई कैदेत होत्या. शाहू महाराज त्यांच्यासमवेत होते. याच ठिकाणी शाहू महाराजांचा विवाह झाला. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाशी निगडित या घटनांमुळे या वारसास्थळाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मंगळवेढ्याच्या संतपरंपरेला अधिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या आधिष्ठानाचे जतन करण्याच्या उद्देशाने संत चोखामेळा स्मारकासाठीही पुढाकार घेणार असून, लवकरच या कार्यास प्रारंभ करण्यात येणार आहे असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com