ढेबेवाडी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा कार्यक्रम

ढेबेवाडी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा कार्यक्रम

Published on

रयतेच्या दारात पोहोचून अभियान यशस्वी करा

जिल्हाधिकारी पाटील : ढेबेवाडी-तळमावल्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर

ढेबेवाडी, ता. ७ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित महाराजस्व अभियान असून, रयतेने तुमच्यापर्यंत नव्हे तर तुम्ही रयतेच्या दारात पोहोचून ते यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आज ढेबेवाडी व तळमावले (ता. पाटण) येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, कृषी अधिकारी विठ्ठल भांबळे, भूमी निरीक्षक सुप्रिया शिंत्रे, हिंदुराव पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन काळे, सचिन यादव, पंजाबराव देसाई, संपदा जाधव, बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, विकास गिरिगोसावी, तानाजी चाळके, भाजपचे गणेश यादव, कविता कचरे, रणजित पाटील, सरपंच रूपाली पाटील, मनोज पाटील, रवींद्र माने आदींसह पदाधिकारी, महसूलसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध गावचे नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, की शिवरायांच्या स्वराज्यात रयतेला काय हवं, काय नको याची माहिती त्यांचे प्रशासन घ्यायचे व आवश्यकतेची परिपूर्तता करण्यासाठी प्रशासन त्यांच्यापर्यंत जायचे, त्यामुळेच त्यांच्या राज्याला रयतेचे राज्य म्हणून ओळखले जायचे. म्हणूनच आज आपण साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतो, त्यांच्या विचारांचा जागर करतो. शासनाची एकच इच्छा आहे, की शासन दरबारी कुणाचेही कोणतेही काम अडकता कामा नये.
शिबिरांतर्गत सातबारा दुरुस्ती, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रलंबित व नवीन वारस नोंदी, अपाक शेरा कमी करणे, राजपत्राने उताऱ्यावरील नावात बदल करणे, एकुम्या शेरा कमी करणे, ॲग्रीस्टाक योजना, इतर नोंदणीकृत व्यवहार, सातबारावरील धारणा प्रकार भोगवटदार वर्ग दोनचे वर्ग एक करणे, सामाजिक अर्थसाह्य योजनेंतर्गत लाभार्थी प्रमाणपत्र व शालेय विद्यार्थ्यांना दाखले वाटप, इतर प्रलंबित फेरफार निर्गती, पाणंद रस्ता नोंद केलेला नकाशा वाटप करण्यात आले. मंडलाधिकारी नागेश निकम, मृदुला कुलकर्णी, तोहिफ मुल्ला आदींनी स्वागत केले. प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव यांनी तालुक्यातील १४ मंडलांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

--------------------
PNE26W01672
ढेबेवाडी : दिव्यांग बांधवाला यूडीआयडी कार्डचे वाटप करताना संतोष पाटील. (राजेश पाटील ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com