नामपूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची शौर्यगाथा पारायणाच्या माध्यमातून अमेरिकेतील विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावी, यासाठी अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या शिवकन्येची धडपड सुरू आहे. सासवड (पुणे) येथील शिवचरित्राच्या अभ्यासक पूनम सागर शिरवळकर असे त्यांचे नाव आहे.