esakal | शिवाजीनगर ते फुरसुंगी इलेव्हेटेड  मेट्रो
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीनगर ते फुरसुंगी इलेव्हेटेड  मेट्रो

शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) नुकताच सादर केला आहे. हा संपूर्ण मेट्रो मार्ग इलेव्हेटेड आहे.

शिवाजीनगर ते फुरसुंगी इलेव्हेटेड  मेट्रो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) नुकताच सादर केला आहे. हा संपूर्ण मेट्रो मार्ग इलेव्हेटेड आहे.

लोकसंख्येचा विचार
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसरला नेण्याची मागणी होत होती. तसेच प्राधिकरणानेही शहरभर मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर भागातही लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे येथून अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच हिंजवडीपर्यंत प्रवास करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसरपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे मध्यंतरी जाहीर केले. त्यामुळे हिंजवडी ते फुरसुंगीपर्यंत मेट्रोच्या मार्गावर शिक्कामोर्तब झाले. 

सर्वेक्षण पूर्ण
शिवाजीनगर न्यायालयात ते फुरसुंगीदरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सर्वेक्षणाचे काम पीएमआरडीएने दिल्ली मेट्रोला दिले होते. दिल्ली मेट्रोने या मार्गाचे सर्वेक्षण करून नुकताच या संदर्भातील अहवाल प्राधिकरणाकडे दिला आहे. १५.५३ किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. तो संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. या मार्गावर एकूण पंधरा स्टेशन असणार आहेत. हा मार्ग उभारण्यासाठी अंदाजे साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.

मेट्रोच्या ५७ कार धावणार
हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगर ते फुरसुंगी असा मेट्रो मार्ग पीएमआरडीएकडून प्रस्तावित केला आहे. संपूर्ण मेट्रो मार्गावरून ५७ मेट्रोच्या कार धावणार आहे.