

पुणे : मंगला चित्रपटगृहाबाहेर एकाचा खून केल्यानंतर १९ महिन्यांपासून फरार असलेल्या पंडित टोळीच्या म्होरक्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी शुक्रवारी दिली.