Pune Crime : मॉडेल कॉलनीत तरुणींकडे पाहून गैरवर्तन करणाऱ्यास अटक
Public Indecency Case Pune : पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात मोटारीत बसून तरुणींकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या एका उच्चशिक्षित अधिकाऱ्याच्या मुलाला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, या विकृत प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे : शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी येथे मोटारीत बसून तरुणींकडे पाहत अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.