इंग्लिश स्कूल वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
MGV25B15008
मंगळवेढा ः वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांचा सन्मान करताना मान्यवर.
लहानपणापासूनच स्वप्नांसाठी संघर्ष करायला पाहिजे ः मुंढेकर
मंगळवेढा, ता. ३० ः आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर लहानपणापासून ते स्वप्न मनाशी बाळगून संघर्ष करायला शिकले पाहिजे तसेच जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कला गुणदर्शन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ॲकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम, अध्यक्ष ॲड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, सचिव डॉ.प्रियदर्शनी महाडिक, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, अजिता भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुंढेकर म्हणाल्या, कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी खूप चांगले विचार आणि चांगली माणसं अवतीभवती असावीत असं म्हणतात. ६४ कला आहेत आणि त्या सगळ्या कला मला या विद्यार्थ्यांमध्ये दिसतात.
अध्यक्ष डॉ. मीनाक्षी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सुनील नागणे यांनी केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या अहवाल वाचन केले. पारितोषिक वितरण समारंभामध्ये ७५ विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

