वेल्हे (पुणे) - रुळे (ता. राजगड )गावच्या शिवांशने जागडेने वयाच्या 22 व्या वर्षी अथक प्रयत्न करत कोणताही कोचिंग क्लास न लावता प्रथम प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन करत देशातून 26 रँक मिळवली आहे..शिवांश जागडेच्या या यशामुळे राजगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तालुक्यातील पहिला आएएस अधिकारी होण्याचा बहुमान पटकावत राजगडच्या मावळ्याने दिल्ली गाजवली आहे..मूळचा राजगड तालुक्यातील असलेला शिवांश वडिलांच्या व्यवसायानिमित्त पुण्यातील वडगाव परिसरामध्ये स्थायिक झाले. शिवांशचे प्राथमिक शिक्षण हे पुण्यात झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण हे संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी ऍग्री चे पदवीचे शिक्षण घेतले. यामध्ये गणित विषय शिवांशने निवडला..स्वभावाने जिद्दी असलेल्या शिवांशने दहा ते बारा तास अभ्यास करून प्रथम प्रयत्नात कोणताही खाजगी क्लास न लावता स्वतःचे नोट्स तयार करून यश प्राप्त केले आहे. यामध्ये शिवांश हा पुण्यातील सिंहगड परिसरातील एका एनजीओचा सक्रिय सदस्य सुद्धा असून, महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षाखालील फुटबॉल संघामधून तो राज्यासाठी खेळलेला आहे..याबाबत अधिक माहिती देताना शिवांशचे वडील सुभाष जागडे म्हणाले, 'शिवांश हा सुरुवातीपासूनच अभ्यासात, सामाजिक उपक्रमात तसेच खेळातही अग्रेसर आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्टा करतो. यूपीएससी परीक्षेतील यश मिळवल्याने त्याच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना वडिलांनी व्यक्त केली..या यशानंतर पुण्यातील वडगाव परिसरामध्ये त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजगड तालुक्यातील भाजपचे नेते सुनील जागडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष किरण राऊत यांच्यासह पुणे जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी शिवांश व त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.