
सात समुद्रापार असलेल्या लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात महाराष्ट्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली.
Shivjayanti in London : सात समुद्रापार लंडन येथे उत्साहात शिवजयंती साजरी
मंचर - सात समुद्रापार असलेल्या लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात महाराष्ट्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली. त्यासाठी आंबेगाव तालुका, पुणे व सातारा भागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. इंग्लंड, पोर्तुगाल, बांगलादेश, इतर देशातल्या विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला. येथे भगवा ध्वज हातात घेऊन 'जय भवानी, जय शिवाजी' असा जयघोष करण्यात आला.
लंडन येथिल ब्रुनेल विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आदित्य ताठे, सौरभ अशोक वळसे पाटील, दीक्षा सतीश जाधव, अदिती गारगोटे, आश्लेषा तोडकर ( पुणे) निसर्ग पवार, ऋषिकेश भगवंतराव माने, (सातारा,) तन्मय साळुंखे (लालबाग मुंबई), सौरभ विलास मते (नाशिक) व इतर विद्यार्थ्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीची व कार्याची माहिती इंग्लिश भाषेत दिली. छत्रपतींच्या शौर्याची माहिती ऐकून परदेशी विद्यार्थी भारावून गेले होते. सिद्धी कापशीकर या विद्यार्थिनीने मराठीतून पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. आरती,पोवाडा व शिवगीतांचे नृत्यविष्कार सादर करण्यात आले.उपस्थितांना नाश्ता देण्यात आला.