Pune Shivjayanti Celebration
sakal
पुणे - एकापेक्षा एक कल्पक पद्धतीने सजलेले ९६ स्वराज्यरथ... ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... रणशिंगांची ललकारी अन् ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा आसमंतात घुमणारा जयघोष... अशा भव्य मिरवणुकीने जणू पुण्यात शिवशाही अवतरली होती. या भव्य स्वराज्यरथ सोहळ्याने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.