उदापूर येथे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त फुलांची सजावट
ओतूर, ता. ६ : उदापूर (ता. जुन्नर) येथे शिव छत्रपती प्रतिष्ठान व उदापूर ग्रामस्थांकडून शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार असलेली शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी उदापूर ग्रामपंचायती समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोठ्याप्रमाणात फुलांची सजावट केली होती, तर विद्युत रोषणाई सर्व चौक आणि जवळच नवीन तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ही विद्युत रोषणाईने उजळून निघाला होते.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेदरम्यान किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवाई देवी मंदिरापासून शिवज्योत पेटवून पायी उदापूर येथे आणली.
या शिवज्योतीला आणताना संपूर्ण १६ किलोमीटर अंतरात शिवज्योत हातात घेऊन धावण्यासाठी तरुणांची चढाओढ सुरू होती. शिवज्योती धावत घेऊन येताना मार्गामध्ये ठिकठिकाणी महिलावर्गाकडून शिवज्योतीचे औक्षण व स्वागत करण्यात येत असल्याने तरुणांचा उत्साह वाढत होता.
उदापूर गावठानातून पारंपारिक वाद्यात शिवज्योतीची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची गाडीवर ठेवून तर मूर्तीची पालखीत ठेवून भव्य मिरवणूक काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना की ‘जय, जय शिवाजी, जय भवानी’ या व इतर घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. उदापूर ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर मिरवणूक आल्यावर तेथे शिवज्योत पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर महाआरती केली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिव छत्रपती प्रतिष्ठान व उदापूर ग्रामस्थांकडून केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

