आपटाळे - किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. १०) शिक्षणासाठी आलेल्या विविध महाविद्यालयातील २८ देशांतील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भेट देऊन गडाची माहिती घेतली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळावर हे परदेशी विद्यार्थी नतमस्तक झाले. छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील गडकिल्ले हे प्रेरणादायी असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.