shivjayanti celebration on shivneri fort preparation
sakal
जुन्नर - स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा ३९६ वा जन्मसोहळा गुरुवारी (ता. १९) किल्ले शिवनेरी येथे पार पडणार आहे. शिवजन्म सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरी सज्ज झाला असून, गडावरील उत्सवाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शिवजन्मस्थळ, शिवकुंज या परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. शिवजयंती उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.