कऱ्हाड शिवराज मोरेंवरील नागपुरातील हल्ल्याचा निषेध

कऱ्हाड शिवराज मोरेंवरील नागपुरातील हल्ल्याचा निषेध
Published on

शिवराज मोरेंवरील हल्ल्याचा निषेध

कऱ्हाडला युवक काँग्रेसची निदर्शने; सरकारविरोधात घोषणाबाजी

कऱ्हाड, ता. ९ ः मनुस्मृतीच्या विरोधात अन् संविधानाच्या समर्थनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे नागपूर येथे ‌‘संविधान सन्मान यात्रा‌’ काढली होती. मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाला असताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
सायंकाळी सातच्या सुमारास दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने झाली. ‘संविधान झिंदाबाद’, ‘मनुस्मृतीचा धिक्कार असो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. निषेधावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकार, पोलिसांच्या विरोधात ‘नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी’, ‘जब जब फडणवीस डरता है, पुलिस को आगे करता है’, संविधान झिंदाबाद, इनक्लाब झिंदाबादच्या घोषणा दिल्या. आंदोलनात संविधानाचा सन्मान, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची भूमिका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
पंचायत समितीचे सदस्य संग्राम पवार, युवकचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, दिग्विजय सूर्यवंशी, सिद्धेश्वर शेटे, विक्रम पाटील, मुकुंद पाटील, देवदास माने, अक्षय सुर्वे, मुबीन पटेल, गणेश सूर्यवंशी, समीर इनामदार, दिगंबर महापुरे, नवतेज पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-----------------

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने चालत आहे. कार्यकर्त्यांवर असा अमानुष हल्ला करणार असतील, तर सरकारचा निषेध करत आहोत. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आगामी काळात महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा संग्राम पवार यांनी दिला.

---------------------
48495
कऱ्हाड ः नागपूर येथे संविधान सन्मान रॅलीत शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला. त्याचा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. त्यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com