शिवरी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाला एक लाखाचे बक्षीस
जेजुरी, ता. ४ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी (ता. पुरंदर) येथे विविध गुणदर्शन समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक लाखापेक्षा अधिक रुपयांची रोख बक्षीस शाळेला मिळाले. लोकसहभागातून शाळेत अनेक उपक्रम राबविले आहेत. लोकसहभागामुळे शाळेची आदर्श शाळेकडे वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, पुरंदर पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर व पुरंदर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामथे व कार्याध्यक्ष पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कामथे यांच्या वतीने गतवर्षीतील गुणवान विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. त्याचबरोबर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना कै. इंदूबाई काशिनाथ लिंभोरे यांच्या स्मरणार्थ विकास काशिनाथ लिंभोरे यांसकडून स्मृतिचिन्ह देण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथील दोन वर्गखोल्या लोकवर्गणीतून बांधल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथे रूम टू रीड या संस्थेच्या वतीने एक सुसज्ज वाचनालय तयार केले आहे. तालुका पातळीवरील, जिल्हा पातळीवरील स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केलेल्या विजयी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सन्मानित केले. ग्रामस्थांच्या मदतीमुळे शाळेचा सर्वांगीण विकास झालेला आहे.
वार्षिक स्नेहसंमेलनात मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देते ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक लाख पाच हजार रुपये बक्षीस रक्कम जमा झाले. कै. गंगाराम गेणू लिंभोरे यांच्या स्मरणार्थ वासुदेव (देवा शेठ) लिंभोरे यांच्याकडून शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सूट घेण्यासाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. सांस्कृतिक कार्यक्रमात शेतकरी गीत, पोवाडा, देशभक्तिपर गीत, लावणी, समाज प्रबोधन गीते आदींचे सादरीकरण केले.
याप्रसंगी वाळुंज केंद्राच्या केंद्रप्रमुख सुरेखा कामथे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियांका कामथे, उपाध्यक्ष संतोष लिंभोरे, सदस्य लहू कामथे, अंकुश कामथे, संतोष जगताप, सचिन कामथे, अजय लिंभोरे, ऋतुजा कामथे, स्वरांजली कामथे, सुवर्णा लिंभोरे, प्रियांका लिंभोरे, महादेव माळवदकर पाटील, सुनील लोणकर, सुनील कुंजीर आदी उपस्थित होते.
श्वेता जगताप, मेघराज कुंभार, प्रकाश जगताप, रूपाली हरिहर, निर्मला पोमण या शिक्षकांनी नियोजन केले. मुख्याध्यापक श्वेता जगताप यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

