esakal | ऐश्वर्याच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री हलविली प्रशासकीय यंत्रणा!
sakal

बोलून बातमी शोधा

aaditya_thackeray_2.jpg

ऐश्‍वर्या पारेख या युवतीने मध्यरात्री 12 वाजून 54 मिनिटांनी वडिलांच्या उपचारासाठी पुण्यात आयसीयुची गरज असल्याचे ट्विट केले.

ऐश्वर्याच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री हलविली प्रशासकीय यंत्रणा!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे, ता. 9 ः माझे वडिल अत्यवस्थ आहेत.... त्यांना पुण्यात आयसीयुची गरज आहे, असे ट्विट पुण्यातील एका युवतीने मध्यरात्री केले.... अन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची तातडीने दखल घेतली. त्या युवतीच्या वडिलांना खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होईल, याची त्यांच्या कार्यालयाने दखल घेतली अन राज्य सरकार नागरिकांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.

ऐश्‍वर्या पारेख या युवतीने मध्यरात्री 12 वाजून 54 मिनिटांनी वडिलांच्या उपचारासाठी पुण्यात आयसीयुची गरज असल्याचे ट्विट केले. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला त्यांनी टॅग केले होते. काही वेळात ठाकरे यांनी त्या ट्विटला रिप्लाय दिला. त्यांनी पारेख यांना त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यास सांगितले. तसेच पुणे महापालिका आयुक्तांशी संपर्क साधत असल्याचेही सांगितले. त्यानंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना त्याची दखल घेण्याची विनंती ठाकरे यांनी केली. अग्रवाल यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला. ठाकरे यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने शहरातील एका खासगी रुग्णालयाशी संपर्क साधला. तेथे पारेख यांना दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या.

Binod आहे तरी कोण? पेटीएमनं त्याच्यामुळे ट्विटर हँडलंच नाव बदललं

दरम्यानच्या काळात महापालिकेचीही आरोग्य यंत्रणा हलली होती. पारेख यांच्यावर उपचार सुरू झाल्यावर, त्यांनी त्या बाबतची माहिती ठाकरे यांना कळविली. ठाकरे यांच्या कार्यालयातूनही त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्यात आला आणि उपचारासाठी आणखी काही मदत हवी असल्यास, ती करण्याची तयारी दर्शविली.
 

अनपेक्षितपणे झालेल्या या मदतीमुळे ऐश्‍वर्या या भारावून गेल्या. त्यांनी ठाकरे यांच्या आणि त्यांच्या टिमचे अहोरात्र काम करून नागरिकांच्या प्रश्‍नांची दखल घेत असल्याबद्दल मनापासून आभार मानले. आशिष गांधी या नेटिझन्सनेही त्या वर प्रतिक्रिया व्यक्त करताना, आदित्य ठाकरे यांच्याकडून या पूर्वीही अशाच प्रकारची मदत झाल्याचा दाखला दिला. या घटनेचा ट्रेंड ट्विटरवर व्हायरल झाला अन्य त्यावर अनेक नेटिझन्सी प्रतिक्रिया दिल्या अन ते ट्विट लाईक केले. राज्य सरकारमधील मंत्री अशा प्रकारे काम करीत असतील तर, नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, आदित्य ठाकरे ब्राव्हो.... अशा अनेक प्रतिक्रिया त्यावर उमटत होत्या.