युतीच ठरेल तेव्हा ठरेल, पण यांच ठरलं; कसब्यातून लढणारच

सागर आव्हाड
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कसबा गणपतीसमोर आरती करून शिवसेना नगरसेवकांनी आपला दावा सांगितल्याने पुण्यात एकच चर्चा रंगली. "त्यांचं ठरायच्या आधीच यांनी ठरवलं" कसबा मतदारसंघातुन शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली.

पुणे : शिवसेना-भाजप युतीची जागा वाटप होण्याआधीच पुण्यात सेनेच्या नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा प्रचार नारळ फोडला.

कसबा गणपतीसमोर आरती करून शिवसेना नगरसेवकांनी आपला दावा सांगितल्याने पुण्यात एकच चर्चा रंगली. "त्यांचं ठरायच्या आधीच यांनी ठरवलं" कसबा मतदारसंघातुन शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली.

युतीचे उमेदवार जाहीर न होताच पुण्यात प्रचाराला सुरवात झाली आहे. पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार प्रचारला लागलो अस सांगत पक्ष प्रामुख्याने आदेश दिले आहेत. जर युती झाली तर आम्ही युतीच काम करू आणि युती झाली नाही तर आमची तयारी आम्ही केली आहे .

कसबा मतदारसंघ सेनेला मिळवा ही मागणी आम्ही केली आहे .15 वर्ष गणपती मंडळाच्या अध्यक्षाला आमदार खासदार केलं आता या गणपती मंडळाच्या अध्यक्षाला आमदार करावं ही कसबा चरणी साकडं घातलं आहे. जागा वाटप होईल तेव्हा होईल पण प्रचार सूरु केला आहे. प्रचार सुरू झाला असला तरी युतीमध्ये जागा वाटप अजून व्हायचं बाकी आहे. त्याच आधी सेनेच्या नगरसेवकांनी सुरवात केल्याने युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणजे झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena may be contest assembly election in Kasba constituency Pune