esakal | आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

भाजपने आमच्या जागा पाडल्या. शरद पवारांच्या मनातही असावे की भाजपचा मुख्यमंत्री नसावा. पक्ष टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर आम्हालाही गरज होती. मला स्वतः खात्री होती भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. तेथून घडत गेले आणि झालेही तसेच.

आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मी सुरवातीपासून लोकांना सांगत होतो, ही 40 दिवसांची माहिम आहे. जो चाळीस दिवस थांबेल त्याचा विजय होईल हे निश्चित होते. अजित पवारांचे प्रकरण घडले तरी मी सांगत होते शांत राहा. 24 तारखेला निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. भाजप जसे ठरले आहे तसे वागेल असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण, तेव्हा काही ठरले नव्हते, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचे हिरो ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सकाळ' कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सत्तास्थापनेवेळी घडलेल्या घडामोडींबद्दल भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले, ''भाजपने आमच्या जागा पाडल्या. शरद पवारांच्या मनातही असावे की भाजपचा मुख्यमंत्री नसावा. पक्ष टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर आम्हालाही गरज होती. मला स्वतः खात्री होती भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. तेथून घडत गेले आणि झालेही तसेच.'' 

मी गेले अनेक वर्षे पक्षासोबत काम करत आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत मी 30 वर्षे काम केले. 28 वर्षै तर मी संपादक होतो. त्यानंतर उद्धव आणि आदित्य ठाकरे आहेत. माझ्या कामामध्ये काही फरक पडला नाही. पिढ्या बदलल्या तरी माझी कामाची पद्धत तशीच आहे. अमिताभची तुलना मुलासोबत करणे हा मुलावर अन्याय आहे. तसेच बाळासाहेब-उद्धव  ठाकरेंबाबत आहे. बाळासाहेब आणि उद्धव यांच्या स्वभावामध्ये फरक आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.