पुण्यात शिवसेनेला बळ मिळणार? सेना नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याकडे केली 'ही' मागणी

समाधान काटे
Friday, 31 July 2020

पुणे शहरातील कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत काल (ता. ३०) बैठक आयोजित केली होती. यावेळी पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

मयुर कॉलनी (पुणे) : पुणे शहरातील कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत काल (ता. ३०) बैठक आयोजित केली होती. यावेळी पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावरून शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री पुण्यात आल्याने शहरात कमकुवत होत चाललेली सेना उभारी घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून मुख्यमंत्र्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मागण्याकडे विशेष लक्ष दिले असल्याचे बोलले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुख्यमंत्र्यांना सेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी निवेदन दिले असून त्या निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये सन २००६ पासून राज्य शासनाच्या प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत नर्स, ऑक्झिनरी नर्स, ज्युनियर नर्स, क्लार्क, शिपाई व इतर असे एकूण ७५ ते ८० कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करीत असून तरी त्यांना कायम करणेबाबत राज्य शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणेची कार्यवाही करण्यात यावी तसेच व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन टोसिलिझुमॅब व रेमिडेसिविर यांचा तुटवडा पुणे शहरात सद्यास्थितीत होत आहे, तरी पुणे शहरातील कोविडच्या रूग्णांची संख्या नियंत्रित होणेसाठी व अत्यवस्थ रूग्णांचा मृत्यु दर कमी राखणेसाठी पुणे महानगरपालिकेस राज्यशासनामार्फत व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन टोसिलिझुर्मेब व रेमिडेसिविर या स्वरूपात मदत मिळावी अशा मागण्या सेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केल्या आहेत.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, नगरसेवक संजय भोसले, नगसेवक विशाल धनवडे, नगसेवक बाळा ओसवाल, नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेवका श्वेता चव्हाण, नगरसेवका संगिता ठोसर, नगरसेविका पल्लवी जावळे, नगरसेविका प्राची आल्हाट यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena office Party Workers to Chief Minister Uddhav Thackeray for various demands In Pune