
Pune Crime News: पुण्यातल्या गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये सोमवारी पहाटे बलात्काराची घटना घडली आहे. खोटी माहिती देऊन एका तरुणीला बसमध्ये बसवलं आणि संधीचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांची आठ पथकं आरोपीच्या मागावर आहेत. या दुर्दैवी घटनेने संताप व्यक्त होत आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून पीडित तरुणी ही २६ वर्षांची आहे.