पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या ‘शिवशाही’ची पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर ‘हिरकणी’ बसमध्ये केले जात आहे. सातपैकी काही बस तयार झाल्या असून, पुढील आठवड्यात पुनर्बांधणी झालेल्या बस ‘हिरकणी’ म्हणून प्रवासी सेवेत धावतील..एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यशाळेत हिरकणीचे काम सुरू आहे. लवकरच राज्यातील उर्वरित दोन कार्यशाळांत ‘हिरकणी’चे काम सुरू होणार आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या ८८० शिवशाही असून, त्याचे टप्प्याटप्प्याने हिरकणीमध्ये रूपांतर होणार असल्याची माहिती एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली..राज्य परिवहन महामंडळामध्ये पहिल्यापासूनच ‘शिवशाही’ची कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत होती. कधी अपघात, तर प्रवाशांना होणाऱ्या असुविधेमुळे ही सेवा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. गेल्या काही दिवसांत शिवशाहीची स्थिती आणखी खराब झाली. परिणामी एसटी प्रशासनाने शिवशाही बसगाड्यांचे रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आठवड्यात सात गाड्या हिरकणी म्हणून धावणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या १९९ हिरकणी बस आहेत. त्यांची संख्या आणखी वाढणार आहे. शिवशाहीमुळे ही संख्या एक हजाराच्या वर जाईल..का झाले रूपांतरशिवशाही बससेवा अनेक ठिकाणी वारंवार बिघाडामुळे चर्चेतदेखभाल खर्च आणि सेवा खोळंबा, यामुळे प्रवाशांची नाराजीप्रवाशांच्या तक्रारी वाढल्यामोठ्या प्रमाणात अपघात झालेपरिणामी राज्य परिवहन महामंडळाने बसची पुनर्बांधणी करून रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.