शिवशक्ती बँकेची आर्थिक स्थिती भक्कम
शिवशक्ती बँकेची आर्थिक स्थिती भक्कम
सरव्यवस्थापक उमाटे यांची माहिती; बॅंकेची बदनामी करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २२ : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी आणि सर्वसामान्यांची महत्त्वाची असलेली शिवशक्ती सहकारी बँक ही चांगल्या स्थितीत असून, बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. तसेच एनपीए जानेवारीअखेर केवळ ९.७ टक्के असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक भारत उमाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
बार्शीतील काही स्थानिक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. परंतु बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खाते यांची करडी नजर असते. त्यामुळे बँक कोणत्याही प्रकारात अफरातफर करू शकत नाही. ज्यांना कुणाला बँकेच्या व्यवहाराबाबत शंका असेल त्यांनी बँकेमध्ये येऊन सत्यता पडताळावी, कुणाच्याही सांगण्यावरून बँकेबाबत बदनामी करू नये, असे आवाहन देखील उमाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून केले आहे.
शिवशक्ती बँकेची कर्ज वसुली देखील चांगली आहे. बँकेचा जानेवारी २०२६ अखेर एनपीए चा दर ९.७ असा आहे. त्यामुळे आरबीआयच्या निर्देशानुसार मार्च २०२६ पर्यंत हा एनपीएचा दर शून्य टक्क्यांपर्यंत आणण्याची आमची खात्री आहे. त्यामुळे विनाकारण बँकेबाबत बदनामी करू नये असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट
- शिवशक्ती बँक भक्कम आहे. त्यामुळे बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार तसेच हितचिंतक यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव आणि डॉ. मीरा यादव यांच्यासारखे तज्ञ संचालक आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नसून ही बँक भक्कम स्थितीत आहे याबाबत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
-डॉ. प्रकाश बुरगुटे, चेअरमन, शिवशक्ती बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

