mulkhed shivling theft
sakal
पिरंगुट - मुलखेड आणि घोटवडे (ता. मुळशी) येथील दोन्ही गावांच्या हद्दीतील डोंगरावरील प्राचीन खंडोबा मंदिर व शिवमंदिर गाभाऱ्यातील पुरातन शिवलिंग काही समाज कंटकांनी उकरून काढून नेले आहे.
शिवलिंगाच्या या विटंबनेमुळे परिसरात नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी व त्यांचे पथक दाखल झालेले आहे. पंचनामा व तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.