
पुणे : पुणे महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या १०० कंत्राटी जवानांची नियुक्ती केली आहे. हे कंत्राटी जवान २६ दिवस काम करतात, पण प्रत्यक्षात त्यांचा ४० दिवसांचा पगार काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गडबड असल्याच्या संशयावरून नव्याने अतिक्रमण निर्मूलन विभागात नियुक्त झालेल्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन महिन्याचा पगार काढला नाही आणि त्यांनी सुरक्षा विभागाकडे दिलेले ३० कर्मचारी परत घेण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकारी अभियंता सदानंद लिटके आणि उपायुक्त सोमनाथ बनकर या दोघांत प्रचंड वादावादी झाली. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे.