esakal | धक्कादायक! पुण्यात पैशाच्या वादातून तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

murder

धक्कादायक! पैशाच्या वादातून तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हातऊसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातुन टोळक्याने एका तरुणा भर दिवसा कोयत्याने वार करून त्याचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खडकीतील बोपोडी पोलिस चौकीसमोर घडली. याप्रकरणी तीन अल्पवयिन मुलांसह पाच जणाविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: भाटघर धरण काही तासांत भरणार

रणजीत सुगंधर परदेशी (वय 32, रा. छाजेड पेट्रोल पंपामागे, बोपोडी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. मन्सूर मौला शेख (वय 19, पत्राचाळ, बोपोडी), किशोर उत्तम गायकवाड (वय 18) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. तर अन्य तीन अल्पवयीन आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत व संशयित आरोपीची एकमेकांशी ओळख होती.

त्याने एका अल्पवयीन मुलाकडुन हातऊसने पैसे घेतले होते. या पैशाची वारंवार मागणी करुनही रणजीत पैसे परत करत नव्हता. त्याचा अल्पवयीन मुलाच्या मनात राग होता. दरम्यान, रणजीत शनिवारी दुपारी अडीच वाजता बोपोडी पोलिस चौकीपासून काही अंतरावर थांबला होता. त्यावेळी अल्पवयिन मुलगा व त्याचे साथीदारा तेथे पोचले. त्यांनी रणजीतवर कोयत्याने वार केले. या घटनेत रणजीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस नाईक धवल लोणकर व पोलिस हवालदार गणेश काळे यांनी आरोपींचा माग काढला.

loading image
go to top