मंचर - 'घर तेच, पण आता जागा मोकळी...' - असाच अनुभव मंचरमधील ८० वर्षांच्या शकुंतला शिवाजी बागल यांना आला आहे. मागील वर्षभर उपचारासाठी मुलीकडे गेलेल्या या वृद्ध महिलेला मंचरला परत आल्यावर आपले घरच गायब झाल्याचा धक्का बसला आहे. या संदर्भात घर चोरीला गेल्याचे निवेदन बागल यांनी मंचर पोलिस ठाण्यात व मंचर नगरपंचायतील दिले आहे.