pune city Congress Spokesperson Hanumant Pawar
sakal
पुणे - कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची घटना शहरातील मित्रमंडळ चौकातील एका वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर सोमवारी (ता. २३) सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.