esakal | पुण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा शिपाई बडतर्फ
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा शिपाई बडतर्फ

सस्ते हा पोलिस शिपाई असून, तो मुख्यालयात कार्यरत होता. 20 ऑक्‍टोबरला मध्यरात्री महिला कर्मचाऱ्याचा डोळा लागल्याची संधी साधून त्याने विनयभंग केला. या प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्याने गोंधळ घातला.

पुण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा शिपाई बडतर्फ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात रात्रपाळीच्या ड्यूटीवर असणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करून बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. अपर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. ही घटना 20 ऑक्‍टोबरला घडली होती. 

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

मयूर ज्ञानेश्वर सस्ते असे बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सस्ते हा पोलिस शिपाई असून, तो मुख्यालयात कार्यरत होता. 20 ऑक्‍टोबरला मध्यरात्री महिला कर्मचाऱ्याचा डोळा लागल्याची संधी साधून त्याने विनयभंग केला. या प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्याने गोंधळ घातला. त्यानंतर संबंधित महिला तक्रार करेल, या भीतीने सस्ते याने क्वार्टर गार्ड खोलीतून बंदूक घेत स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गार्ड अंमलदार दत्तात्रय बेंढारी यांनी सस्तेकडून बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला. ती गोळी बेंढारी यांच्या हाताला लागली. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर सस्ते याला अटक करण्यात आली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image