Satish Wagh Murder Update sakal
पुणे
Satish Wagh Murder Update : पत्नीने सुपारी देवून केला सतीश वाघ यांचा खून; पत्नीला अटक
Murder Investigation : हडपसरमधील शेतकरी व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या अपहरण आणि खूनप्रकरणात पत्नीचाच सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुणे : हडपसरमधील शेतकरी तसेच हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या अपहरण व खूनप्रकरणाला वेगळे वळण लागले असून, या खूनप्रकरणात त्यांच्या पत्नीचाच सहभाग असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. पत्नीनेच सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांच्या पत्नीला देखील बुधवारी अटक करण्यात आली आहे.