Pune Crime : छऱ्याच्या बंदुकीतून श्वानावर गोळीबार, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

छऱ्याच्या (स्पोर्ट॒स) बंदुकीतून श्वानावर गोळीबार केल्याची घटना मांजरी परिसरातील एका सोसायटीत नुकतीच घडली
shooting a dog with gun case registered in Hadapsar police station
shooting a dog with gun case registered in Hadapsar police stationesakal
Updated on

पुणे : छऱ्याच्या (स्पोर्ट॒स) बंदुकीतून श्वानावर गोळीबार केल्याची घटना मांजरी परिसरातील एका सोसायटीत नुकतीच घडली. या घटनेत श्वान बाउंसी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रीती विकास अग्रवाल (वय ४६, रा. किरण एनक्लेव्ह, लोकमंगल सोसायटी, मांजरी बुद्रूक) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अली रियाज थावेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अग्रवाल आणि आरोपी रियाज हे लोकमंगल सोसायटीत राहतात. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्वान बाऊंसी सोसायटीच्या आवारात बसला होता. त्यावेळी श्वानाच्या त्रासामुळे थावेरने छऱ्याच्या बंदुकीतून त्याच्यावर गोळीबार केला.

श्वानाच्या पायात छरे घुसल्याने तो विकलांग झाला आहे. थावेर याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. के. गोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com