Pune News : व्यवस्थापकास तीन वर्षे सक्तमजुरी; बालेवाडीतील प्रशिक्षणार्थी नेमबाज मुलीवर अत्याचार प्रकरण
Balewadi Case : बालेवाडीतील नेमबाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाने व्यवस्थापकाला ३ वर्षांची सक्तमजुरी आणि सात हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
पुणे : बालेवाडीतील नामांकित नेमबाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खेळाडू व्यवस्थापकाला तीन वर्षांची सक्तमजुरी आणि सात हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली.