

सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार;
२५ वर्षाच्या संशयितास अटक
सोलापूर, ता. २७ : दुकानात मिक्सर दुरुस्त करायला घेऊन गेल्यावर दुकानदाराने घरात नेऊन इच्छेविरूद्ध अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अंकुश परमात्मा आनंदकर (वय २५, रा. दिक्षित नगर, ताई चौक) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
२४ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास दिक्षित नगरातील अंकुश आनंदकर याच्या दुकानात १६ वर्षीय पीडिता मिक्सर दुरुस्तीसाठी गेली होती. घरी केाणी नसल्याची संधी साधून त्याने तिला घरात नेले. त्यानंतर इच्छेविरूद्ध पीडितेवर अत्याचार केला. १५ दिवसांनी पुन्हा त्याने घरी कोणी नसताना मला बोलावून पुन्हा इच्छेविरूद्ध अत्याचार केले, असेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेने २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी लगेच संशयितास अटक केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अटकेतील संशयितास बुधवारी (ता. २८) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.