
Indapur Fire Accident : कुरवली मध्ये दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग...
वालचंदनगर : कुरवली (ता. इंदापूर) येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगी मध्ये तीन पेक्षा अधिक दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांची लाख रुपयाचे नुकसान झाले. शुक्रवार (ता.१७) रोजी सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक, मोबाईल, ऑटोमोबाईल्स, फर्निचर, दुकानाचा समावेश आहे. यामध्ये गणेश आबाजी जठार यांचे गणेश ऑटोमोबाईल्स,अमोल रामचंद्र जठार यांचे स्नेहा ट्रेडर्स व सागर नारायण रुपनवर यांचे अनिश इलेक्ट्रॉनिक & मोबाईल शॉपी व फर्निचर यांचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी आगीच्या ज्वाला भडकल्या होत्या.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून शेजारील दुकानातील साहित्य बाहेर काढल्याने दुकानदारांचे नुकसान टळले. अग्निशामक दलाने रात्री उशिरा ही आग आटोक्यात आणली. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे,
वालचंद नगरपोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, कुरवली चे सरपंच राहुल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये खबर देण्याचे काम सुरू आहे.