ते तब्बल 2 लाखांची बॅग दुकानात विसरले अन्....

महेश जगताप 
गुरुवार, 23 जानेवारी 2020

राजगोपाळजी सोमाणी यांच्या के. के. मार्केट या दुकानात एक ग्राहक आपली बॅग विसरुन गेले. कोणीतरी बॅग विसरुन गेल आहे हे त्यांना लक्षात आले...

स्वारगेट (पुणे) : समाजात माणसा माणसावर कमी होत चाललेला विश्वास, मग त्यात घडलेली एखादी घटना समाजात अजून माणुसकी जिवंत आहे याचे दर्शन घडवते. अनंत गोगावलेंची खरेदीसाठी आल्यावर राहिलेली पैशाची बॅग एका प्रामाणिक व्यापाऱ्याने परत केली आहे.

पुण्यातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष वाय-फायसह सज्ज

राजगोपाळजी सोमाणी यांच्या के. के. मार्केट या दुकानात एक ग्राहक आपली बॅग विसरुन गेले. कोणीतरी बॅग विसरुन गेल आहे हे त्यांना लक्षात आले.
त्यांनी सीसीटिव्ही चेक केला. कोणत्या कस्टमरच्या हातात ही बॅग होती. हे लक्षात आले.या कस्टमरने कार्ड स्वॅप करुन पेमेंट केले होते. त्यावरुन त्यांनी त्या ग्राहकाला फोन करुन बॅगेची कल्पना दिली. त्या बॅगेत अंदाजे 2 लाखाच्या नोटा होत्या. बॅग परत घेण्याकरिता आलेले ग्राहक हे एक खेड शिवापूरचे डाॅक्टर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपली बॅग परत घेऊन या प्रामाणिक व्यापार्‍याने कृतज्ञता व्यक्त करीत आनदांने काही रक्कम राजगोपाळजी यांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती त्यांनी नाकारली व आपले फक्त आशीर्वाद द्या, असे सांगितले. डाॅक्टर भारावून गेले, परत येऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांनी राजगोपाळजी यांचा सन्मान केला. गोकुळ सोमाणी यांचे वडील राजगोपाळजी सोमाणी यांचे सर्व समाजाच्या वतीने कौतुक व अभिनदंन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shop owner returns bag to customer who forgot his bag at shop in Pune