जळालेल्या स्वप्नांना मिळाला मदतीचा फुलोरा

जितेंद्र मैड
शनिवार, 27 जून 2020

टपरीधारकांना मिळाली शिलाई मशिनची मदत

कोथरूड (पुणे) : कोथरूड पोलिस स्टेशन जवळील सिलेंडरच्या स्टाॅलला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत सोमेश्वर पुष्प भांडार,  अभिषेक कुशन वर्क्स व वसुंधरा बॅग्स या स्टाॅलचे आगीमुळे नुकसान झाले होते. कोरोना संकटामुळे आधीच बेजार झालेल्या स्टाल धारकांवर या अपघातामुळे दुःखाचा डोंगरच कोसळला. या कुटुंबांना सावरता यावे म्हणून कर्तव्य भावनेतून नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अभिषेक कुशन वर्क्स व वसुंधरा बॅग हाऊस या स्टाॅलधारकांना शिलाई मशिन व सोमेश्वर पुष्प भांडारला आर्थिक मदत दिली.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

 यावेळी  राहुल देशपांडे, अॅड गणेश वरपे, पहिलवान किरण वरपे, अॅड. आनंद माझिरे, अमित तोरडमल, विनायक वरपे, प्रणव उभे, हर्षद ओझा, सचिन मारणे, सचिन कानगुडे, शेखर मोहोळ, पप्पू टेमघरे, दत्तात्रय गांडले, स्वप्निल वैद्य, ओंकार शिंदे, दर्शन पोळके  उपस्थित होते. स्टाॅल धारक मच्छिंद्र फलटणकर म्हणाले की, माझी पत्नी कॅन्सर पीडीत आहे. त्यातच लाॅकडाऊनमुळे आमची रोजी रोटी बंद झाली आहे. आत्ता कुठे काम सुरू केले तर टपरीला आग लागली. माणुसकी जिवंत आहे. म्हणून आम्हाला हा मदतीचा हात मिळाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The shop owners who got burnt in the fire got a helping hand