
तपकीर गल्लीमधील समर्थ प्लाजा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 25 क्रमांकाच्या दुकानात मोबाईल शॉपी आहे. या दुकानाला गुरुवारी रात्री अकरा वाजता अचानक आग लागली.
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील तपकीर गल्लीतील एका इमारतीमधील एका मोबाईल शॉपीच्या दुकानाला गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशामक दलाने तेथे तत्काळ पोहचून 500 लोकांना सुखरुप बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळविले.
तपकीर गल्लीमधील समर्थ प्लाजा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 25 क्रमांकाच्या दुकानात मोबाईल शॉपी आहे. या दुकानाला गुरुवारी रात्री अकरा वाजता अचानक आग लागली. इमारतीमधील रहीवाशानी याबाबत तत्काळ अग्निशामक दलाला खबर दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या काही वेळातच तेथे पोहचल्या. त्यांनी प्रारंभी तेथील 500 रहीवाशांना सुखरूप बाहेर काढले.
त्यानंतर दुकानाचे शटर कटरच्या मदतीने तोडून दुसऱ्या मजल्यावरील दुकानात लागलेल्या आगीवर होजची लाईनकरून आग पुर्णपणे विजविली. आगीवर नियंत्रण मिळविले. दुकानामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली होती. अग्निशामक दलाचे सुनिल नाईकनवरे, तांडेल आनिल करडे, फायरमन जगदाळे, बुंदेले, गायकवाड, कारंडे या जवानांनी कामगिरी केली.
संपादन - सुस्मिता वडतिले