शहराच्या पेठांमध्ये खरेदीदार- दुकानांच्या अतिक्रमणामुळे श्वास कोंडतोय

शहरातील पेठांमध्ये दुकानांमध्ये खरेदीदारांची भाऊगर्दी, वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यात वाहने उभी केली जातात.
Encroachment in Pune City
Encroachment in Pune Citysakal

कॅन्टोन्मेंट - शहराच्या पेठांमध्ये खरेदीदार- दुकानांच्या अतिक्रमणामुळे श्वास कोंडत आहे. ध्वनी-वायू प्रदूषणामुळे स्थानिकांसह वाहनचालकांचा जीव होतोय कासावीस होत असल्याने पालिका आणि वाहतूक पोलीस यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून दुकानदार-खरेदीदारांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक हिंद माता प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष गोपाळ आगरकर यांनी केली आहे.

शहरातील पेठांमध्ये दुकानांमध्ये खरेदीदारांची भाऊगर्दी, वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यात वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ध्वनी, वायू प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडत आहे. कोरोनाचा ज्वर संपला नाही, त्यात ओमायक्रॉनची भीती वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना अंमलात आणाव्यात, असा सल्ला ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.

Encroachment in Pune City
कोलवडीत गूळ व साखरेचा ९ हजार ६२८ किलोचा साठा जप्त

कसबा पेठेतील शांतिनाथ दिगंबर खंडेलवाल जैन मंदिर चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केल्याने रस्ता गजबजून गेला आहे. हा चौक गणेश पेठ, रविवार पेठ, बोहरी आळी, मंडई, फडके हौद, लक्ष्मी रोड आदी रस्त्यांना छेद देतो. चौकातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. हे ठिकाण शहरातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची मोठी भर पडते. त्यामुळे रोजची येजा करण्याची वर्दळ याठिकाणी कायम असते. त्यामुळे पायी चालताना देखील नागरिकांना कसरतच करावी लागते. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. यावेळी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून ही समस्या सोडवावी असे ही आगरकर यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका सुलोचना कोंढरे म्हणाल्या की, ही समस्या सोडविण्यासाठी अनेकदा आम्ही प्रयत्न केले आहे. यात्रिक होटेल च्या समोर सोन्या मारुती चौकात पार्किंगला जागा आरक्षित आहे. याजागेचा वापर करून त्याठिकाणी भव्य अद्यावत पार्किंग उभारण्यात येईल.सध्या खरेदीसाठी जाताना नागरिक महिलांनी दस मे बसचा वापर करावा. तसेच दुचाकी पूर्णपणे बंद करून वॉकिंग प्लाझा या उपक्रमाला वाहतूक विभागाने प्राध्यान्य दिल्यास वाहतूक व पार्किंगची समस्या सोडवण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com