बारामतीतील दुकाने 52 दिवसांनी उघडली, नागरिकांनी पहा काय केले... 

मिलिंद संगई
Monday, 11 May 2020

गेल्या अनेक दिवसांपासून घरात लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अनेक बारामतीकरांनी आज मनमोकळा श्वास घेतला. रस्त्यांवर ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी होती. 

बारामती (पुणे) : बारामती शहराचे गेल्या 52 दिवसांपासून थंडावलेले व्यापारचक्र आजपासून पूर्ववत सुरू झाले. गेल्या अनेक दिवसांपासून घरात लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अनेक बारामतीकरांनी आज मनमोकळा श्वास घेतला. रस्त्यांवर ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी होती. 

कुलकर्णी दांपत्याचा फुटला अश्रूंचा बांध...म्हणाले, "सुप्रिया सुळे यांच्यामुळे...'  

दुकानदारांनीही आज प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीची पूर्तता करत दुकाने उघडली. मास्क, हॅंडग्लोव्हज, सॅनेटायझरचा वापर करत व शारीरिक अंतर पाळून आज ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात होता. अनेक दिवसांनी बाजारपेठ सुरू झाल्याने लोक रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. प्रशासनाने ठरवून दिल्यानुसार ऑटोमोबाइल्स, कॉम्प्युटर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकाने, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी, फोटो स्टुडिओ, स्वीट होम्स, खेळणी, फुले व पुष्पहार दुकाने सुरू करण्यात आली होती. आज बहुसंख्य दुकानदारांनी स्वच्छता करत आज दुकानातील माल लावून घेतला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आज पहिल्या दिवशी फार गर्दी होणार नाही, असा दुकानदारांचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात लोकांनी खरेदीसाठी रांगा लावल्या. शारीरिक अंतर ठेवून ग्राहकांनी खरेदी केली. आवश्‍यक सामानाची दुकाने सुरू झाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. बहुसंख्य दुकानदारांनी आपल्या दुकानात रजिस्टर ठेवले होते व येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर व पत्त्याची नोंद केली जात होती. 

आळंदीच्या वेशीवर कोरोना, आतातरी रस्त्यावरील मंडई हटवा   

बारामतीच्या रस्त्यांवर आज अनेक दिवसांनी गजबजाट दिसला. नागरिक अनेक दिवसांनी घराबाहेर पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. व्यापारी महासंघाच्या वतीनेही दुकाने सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shops in Baramati opened after 52 days, citizens see what they did