esakal | मंचरकरांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून दुकानांच्या वेळेत होणार 'हा' बदल 
sakal

बोलून बातमी शोधा

manchr.jpg

मंचर शहरात (ता. आंबेगाव) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून (ता. 26) संध्याकाळी पाचनंतर शहरातील सर्व दुकाने, भाजीबाजार, फळ विक्रेते, पार्सल देणारी हॉटेल पूर्णपणे बंद राहतील. नियमाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा तहसीलदार रमा जोशी यांनी दिला. 

मंचरकरांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून दुकानांच्या वेळेत होणार 'हा' बदल 

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : मंचर शहरात (ता. आंबेगाव) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून (ता. 26) संध्याकाळी पाचनंतर शहरातील सर्व दुकाने, भाजीबाजार, फळ विक्रेते, पार्सल देणारी हॉटेल पूर्णपणे बंद राहतील. नियमाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा तहसीलदार रमा जोशी यांनी दिला. 
मंचर ग्रामपंचायत सभागृहात व्यापारी व प्रशासनाची बैठक झाली. यावेळी पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, ग्रामपंचायतीचे प्रशासक, सहायक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, ग्रामविकास अधिकारी सचिन ऊडे, कामगार तलाठी हेमंत भागवत, अनुप कवाने, तसेच व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पूर्ण लॉकडाउन करू नका, संध्याकाळी पाचनंतर लॉकडाउन करा, जे व्यापारी चुकतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,' अशा मागणीचे निवेदन व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिले. जोशी म्हणाल्या, ""बुधवारी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडीलकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक होणार आहे. सध्या गर्दी फार वाढली आहे. नियम पाळले जात नाहीत. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.'' 

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

खराडे म्हणाले, ""मास्क न वापरणारे, तसेच दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाईल. दवाखाने व काही मेडिकल स्टोअर उघडण्यास परवानगी राहील.'' तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनीही मार्गदर्शन केले. 

loading image
go to top