मांडवगण फराटा परिसरातील दुकाने बंद असल्यामुळे व्यावसायिक रडकुंडीला

मांडवगण फराटा परिसरातील दुकाने बंद असल्यामुळे व्यावसायिक रडकुंडीला
Updated on

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील बाजारपेठ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले पाच दिवसापासून अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद असल्यामुळे व्यावसायिक रडकुंडीला आला आहे. गेल्या वर्षी सुद्धा व्यावसायिकांची अशीच अवस्था झाली होती. सलग चार महिने दुकाने बंद होती. या लॉकडाऊन मध्ये हातावर पोट असणाऱ्या लहान व्यवसायीक यांचीच दुकाने बंद होती. हे दुकानदार नेहमीच पतपेढी, बँक यांच्याकडून आर्थिक कर्जे काढून आपला व्यवसाय करत असतात. प्रत्येकाला दुकान भाडे, लाईटबील, कर्जाचे हप्ते बंद काळात सुद्धा सुरूच होते. त्याचे ओझे अजूनही डोक्यावर असताना पुन्हा लॉकडाऊन लादल्याने या भागातील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत.

असेच सतत लॉकडाऊन करायचे असेल तर शासनाने बँकेचे हप्ते, दुकानभाडे, लाईटबील माफ करावे. सर्वजण काम करतील तेव्हा घर चालविणारे असल्यामुळे त्यांचे घर चालेल अशी मदत शासनाने करावी अशी मागणी व्यवसायिक यांनी केली आहे.

लॉकडाऊन मुळे मांडवगण फराटा परिसरातील बाजारपेठा सुन्न पडल्या आहेत. शुकशुकाट जाणवत आहे. काही व्यापारी छोटा मोठा व्यवसाय करून आपला घराचा गाडा चालविताना आधीच मेटाकुटीला आलेला असतो  परंतु दुकाने बंद केल्यामुळे आत्ता पुन्हा  व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे शेतीमालाचे नियोजन देखील  ढासळले आहे. गावामधील छोटे मोठे भाजी व्यापार करणारे दुकान देखील बंद असल्याने  सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. शासनाने दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी व तसेच त्यामध्ये सर्व दुकानदारांना ठराविक वेळ द्यावी जेणेकरून सामान्य दुकानदाराना आपला घर प्रपंचाला हातभार लागेल व त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी केलेल्या तरकारी पिकांना मोठा फटका बसला होता. अक्षरश: शेतकऱ्यांना कलिंगड खरबूज फेकून द्यावी लागली होती. सध्या अनेक शेतकऱ्यांचे कलिंगड, खरबूज, केळी, द्राक्षे, कोबी आदी फळे व तरकारी पिके काढण्यास आली आहेत. आधीच या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. त्यातून शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. पुन्हा लॉकडाऊन कडक झाले व भाजी व फळेमार्केट बंद झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे लागेल त्यामुळे शासनाने लॉकडाऊन न करता नियम कडक करून तो पाळणे बंधनकारक करावे असे व्यापारी, व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. व्यापारी व व्यवसायिक यांची सध्याची परिस्थिती कोरोनामुळे अतिशय बिकट झाली आहे.

सध्या शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील तरकारी पिकांची बाजारपेठेत आवक जास्त प्रमाणात सुरु असून रास्त बाजारभाव मिळत नाही त्यामुळे बाजारभावा अभावी शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल किंमतीला विकावा लागत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने दुकानांना वेळेचे बंधन घालून व सर्व कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करून दुकाने उघडण्यास  परवानगी घ्यावी अशी व्यापारी, व्यवसायिक संघटना पदाधिकारी व सदस्यांनी मागणी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com